Posts

Showing posts from August, 2019

paithani saree yeola

पैठण ही पुरातन काळी महाराष्ट्राची राजधानी होती. या पैठण मध्ये तयार होणारी वैशिष्ट्यपूर्ण साडी म्हणजे ' पैठणी '. चौकोनी नक्षी तसेच पदरावरील मोराच्या नक्षीमुळे पैठणी लगेच ओळखू येते.  पैठणी ही कापसाचा धागा व रेशीम यांच्यापासून हातमागावर विणलेली एक विशिष्ट प्रकारची नक्षी असलेली साडी आहे. या मध्ये पदरावर मोराची तोता-मैना अशी चित्रे असलेले जरीकाम असते.  पूर्वी पैठणी फक्त मोरपंखी रंगातच मिळत असे परंतु आता अनेक रंगात मिळते.  जुन्या काळी पैठणी मध्ये सुती धागे आणि पदारासाठी रेशीम आणि जर वापरले जायचे.  आजकाल मात्र पैठणी ही पूर्णपणे रेशमी आणि पदरावर जर वापरून बनवली जाते. उभा धागा एका रंगाचा आणि आडवा धागा वेगळ्या रंगाचा वापरून पैठणीला 'धुपछाव' प्रकारचा परिणाम दिला जातो. पैठणीच्या अंगावर कोयरी, आंबा, अश्रफी, बांगडी मधील मोर,अमरवेल ,नारळ, पारवा, पोपट अशी नक्षी आढळते.    पदरावर मोर, तोता मैना, पोपट, भौमितिक आकाराची फुले, पदारातील जर पक्की करण्यासाठी लहर नावाची पट्टी, आसावली म्हणजेच फुले असणारे कलश, मुथाडा, बारवा असे विविध नक्षी प्रकार आढळतात. ...